नारायण राणेंना आलं हाेतं टेन्शन म्हणाले, आंघाेळ करता करताच थांबलाे, वेड्यासारखा!

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याच लक्ष लागून राहिले हाेते.
narayan rane
narayan rane
Published On

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या (Sindhudurg District Bank Election Result) निकालानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा आजच्या पत्रकार परिषदेतील मूड वेगवेगळ्या प्रश्नांवर बदलताना दिसला. नितेश राणेंबाबतच्या प्रश्नांवर राणे कधी उत्तर देत हाेते तर कधी बाेलण्याचे टाळताना देखील दिसले. तर कधी आक्रमक हाेत हाेते. राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्यासह महाविकास आघाडीतील (Nitesh rane vs Mahavikas aghadi) घटक पक्षांवर टीका करताना राणे पत्रकारांवर देखील घसरत हाेते. राणेंच्या देहबालीतून आणि वक्तव्यातून आजच्या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्ट हाेत हाेते. दरम्यान राणेंनी पत्रकार परिषद सुरु हाेण्यापुर्वी एकास तू आम्हांला टेन्शनमध्ये पाठवलं हाेतेस असे म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. bjp leader narayan rane addressed media in kankavali after sindhudurg dcc bank election result

नितेश राणेंचा (nitesh rane) जामीन अर्ज फेटाळला यावर आपलं काय मत आहे. या प्रश्नावर राणे म्हणाले मी उत्तर देणार नाही. बाेललाे की पुन्हा एक केस. नितेश राणेंनी समाज माध्यमात एक फाेटाे शेअर केला आहे. त्यांनी गाडलाच असे म्हटलं आहे. त्यावरही राणेंनी मी ताे पाहिलेला नाही. पुढं राणे बाेलताना म्हणाले छायाचित्रात गाडलं की वास्तवादी गाडलं हे मला जाेपर्यंत कळत नाही असे बाेलून राणेंनी मी ते पाहिले नसल्याने यावर बाेलणार नाही असा सूर आवळला.

narayan rane
"यांची लायकी पोस्टर लावण्याची" राणेंची शिवसेनेवर टीका!

जिंकलेल्या उमेदवारांपैकी काेणाला बॅंकेचे (dcc bank) अध्यक्ष करणार आहात. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले मला अजून भेटला नाही तिथून इथंपर्यंत आलाे. पण काेणी भेटला नाही. चिठ्ठीवरील विजयी उमेदवार करणार का? या प्रश्नावर राणेंनी त्यांचे श्रम नाहीत का असं म्हटलं. पुढं बाेलताना राणे म्हणाले अध्यक्षपदाचे दावेदार काेण असेल हे मला माहित नाही. मला काेणाला गॅसवर ठेवायचे नाही. सगळेजण स्पर्धेत राहू देत. प्रत्येकाला वाटलं पाहिजे मला संधी मिळेल असे राणेंनी नमूद केले. त्यावर एकच हशा पिकला.

टेंशनमध्ये पाठवलंस

दरम्यान पत्रकार परिषदेपुर्वी महाविकास आघाडीचे प्रमुख उमेदवार सतीश सावंत यांचा पराभव करणा-या विठ्ठल देसाई यांच्याकडे कटाक्ष टाकत जिंकला! खरं वाटतयं. नशीब आहे हं नशीब, चिठ्ठीवर येणं म्हणजे माेठे नशीब आहे असे नारायण राणेंनी (narayan rane) हसत हसत म्हटलं.

त्यापुढं राणे देसाईंना म्हणाले तू तर आम्हांला टेंशनमध्ये पाठवलंस. मी आंघाेळ करायला निघालाे हाेताे. थांबलाे, असे स्मितहास्य करीत राणेंनी नमूद केले. त्यावेळी उपस्थितांनी खरचं त्यांना विजय झाल्याची अजूनही खात्री नाहीये असे म्हणताच एकच हशा पिकला.

narayan rane
असे आहे Sindhudurg DCC चे नवे संचालक मंडळ; कार्यकर्ते खूष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com