Chhagan Bhujbal: देशात भाजपची लाट कमी झाली; छगन भुजबळ यांची भाजपवर टीका

'चार राज्यात भाजपची सत्ता आली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये 50 आमदार कमी झाले आहेत'.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam Tv

नाशिक: चार राज्यात भाजपची (BJP) सत्ता आली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये 50 आमदार कमी झाले आहेत. त्यामुळे देशात भाजपची लाट कमी झाली असल्याची टीका, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. देशात भाजपची लाट कमी झाली असल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये (Election) त्याचा फरक जाणवेल. आगामी काळातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असा दावाही मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष नेमण्याचे पत्र पाठवले आहे. त्यावर लवकरच राज्यपाल निर्णय घेतील. असेही ते म्हणाले. मंत्री छगन भुजबळ आज नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis Video: 'अनेक शेतकरी आत्महत्येच्या प्रयत्नात'- देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नव्याने प्रभाग रचना जाहीर करणार

ओबीसी (OBC) आरक्षणाबाबत बांठिया कमिशन नेमलेले आहे. बांठिया भारतीय जनगणना आयुक्त होते. अजुन काही लोक आहेत जे ओबीसी आरक्षणाबाबत 2 ते 3 महिन्यात काम पूर्ण करतील अशी लोक काम करत आहेत. काही राज्याने अध्यादेश काढले तसाच अध्यादेश आम्ही काढला आहे. विधानसभा, विधानपरिषदेमध्ये ठराव मंजूर करून त्यावर राज्यपाल यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे नव्याने आगामी निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर करणार आहे, असही ते म्हणाले.

महाराष्ट्रात भाजपला (BJP) सत्ता येण्यासाठी भाजपला अजुन दोन ते अडीच वर्षे वाट पहावी लागेल असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com