नागपूरात रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी भाजपचा मोर्चा

भाजपचे अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
नागपूरात रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी भाजपचा मोर्चा
नागपूरात रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी भाजपचा मोर्चासंजय डाफ
Published On

नागपूर - रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे या मागणीसाठी भाजपने आज नागपूरात वंचित लाभार्थ्यांचा मोर्चा काढला. संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. भाजपचे अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रमाई घरकुल योजनेतील लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे देखील पहा -

रमाई घरकुल योजने अंतर्गत नागपूरात 3 हजारांवर लाभार्थी आहेत. मात्र, राज्य सरकारने या योजनेतील निधी अद्याप दिला नाही. त्यामुळे हे लाभार्थी अजूनही मालकी हक्काच्या घरापासून वंचित आहेत. फडणवीस सरकारच्या काळात 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, तो निधी सरकारने दिलेला नाही. राज्य सरकारला या योजनेचा निधी द्यायचा नाहीय, सरकार दलित विरोधी आहे असा आरोप यावेळी भाजपचे अनुसूचित मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com