इंधन दरावरुन भाजपाचा 'महाविकास' वर राेष; मलिकांच्या अटकेची मागणी

हे आंदाेलन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
bjp protest in sangli
bjp protest in sangli
Published On

सांगली : पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट रद्द करण्याच्या मागणी करत येथील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी विश्रामबाग येथे आंदाेलन केले. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याच्या मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आंदाेलकांनी मंत्री मलिक यांच्या प्रतिकात्मक चित्रास जोडा मार आंदोलन केले. हे आंदाेलन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. petrol diesel price hike bjp agitation nawab malik sangli news

bjp protest in sangli
शब्द न पाळल्याने ३ हजार आशा सेविकांनी लसीकरणाचे काम केले बंद

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात पाच आणि दहा रुपयांची कपात केली.आता राज्य सरकारची कपात करण्याची जबाबदारी आहे.पेट्रोल व डिझेलवर लावण्यात आलेला व्हॅट राज्य सरकारने कमी करावा या मागणीसाठी आघाडी सरकार विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी यांच्याकडून जमिनी विकत घेण्यात आल्या असून हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून भाजपच्या वतीने याबाबतचे पुरावे देण्यात आले आहेत.

या विषयावर राज्य सरकार कोणतीच भूमिका घेत नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नवाब मलिक यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी मलिक यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला भाजप कार्यकर्त्यांनी जोडे मारून सरकारच्या नाकर्तेपणाचा bjp protest in sangli निषेध नोंदवला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com