
तेजल नागरे, साम प्रतिनिधी
राज्यात बर्ड फ्लूनं थैमान घातलंय. उरणनंतर आता लातूरमध्ये तब्बल चार हजारांपेक्षा जास्त कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर मुंबई परिसरातही बर्ड फ्लूची दहशत पसरल्यामुळे चिकन विक्री बंद करण्यात आलीय. नेमका कशामुळे बर्ड फ्लू परतलाय त्यावरचा विशेष रिपोर्ट.
अगदी दोनच दिवसांपूर्वी रायगडमधील उरणमध्ये हजारो कोंबड्या दगावल्याची घटना ताजी असताना आता लातूरमध्येही जवळपास 4000 कोंबड्याचा मृत्यू झालाय..या कोंबड्यांची सॅम्पल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांत कुठे कुठे बर्ड फ्लूची लागण होऊन पक्षी आणि कोंबड्यांचा मृत्यू झालाय पाहुयात.
लातूरमधील ढाळेगावात 4200 कोंबड्यांचा मृत्यू
नागपुरातील कामठीजवळ पाच मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू
रायगडमधील उरण गावात 1237 कोंबड्यांचा मृत्यू
चिरनेरमध्ये दीड हजार कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण
उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे अनेक कावळ्यांचा मृत्यू
बर्ड फ्लू बाधित चिकन खाल्ल्याने नागपुरात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू
दुसरीकडे बर्ड फ्लू आता मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यापर्यंत पोहोचलाय.ठाण्यातही जवळपास 21 कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असून या परिसरात रहाणाऱ्या १७५ जणांची आरोग्य तपासणीही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत ज्याठिकाणी पादुर्भाव झाला आहे तिथे कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदीही घालण्यात आली असून चिकनची दुकानंही बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.