Fact Check : प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात बिल गेट्सची हजेरी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? पाहा

bill gates Latest News: प्रयागराजचा महाकुंभमेळा वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. आता मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही महाकुंभमेळ्यात येऊन गंगेची डुबकी लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. काय आहे या व्हिडिओमागचं व्हायरल सत्य? ते पाहूयात...
bill gates news
bill gatesSaam tv
Published On

हा व्हिडिओ पाहिलात...या व्हिडीओतून दावा करण्यात आलाय की महाकुंभमेळ्यात मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी उपस्थिती लावलीय. सोशल मीडियात हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. खरंच बिल गेट्स यांनी महाकुंभमेळ्याला हजेरी लावलीय का? बिल गेट्स कुंभमेळ्यात येऊन गेल्यानंतरही माध्यमांना याची खबर का लागली नाही?

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरलाय. अनेक साधू-महंत या कुंभमेळ्यात सहभागी झालेत. जगभरातील सेलिब्रिटीही कुंभमेळ्याला उपस्थिती लावतायेत. नुकताच ऍपलचे फाऊंडर स्टीव जॉब्ज यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली. त्यानंतर आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हिडीओत दिसणारी काळा चष्मा घातलेली व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स असल्याचा दावा करण्यात आलाय. व्हायरल मेसेजमध्ये काय म्हंटलंय पाहूयात

व्हायरल मेसेज

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात हजेरी लावली आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं

बिल गेट्स खरंच कुंभमेळ्यात आले होते का? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही या मेसेजची आणि व्हिडीओची पडताळणी केली. हा व्हिडीओ रिव्हर्स करून पाहिला. तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.

bill gates news
Electricity Bill: बापरे! व्यापाऱ्याला तब्बल ₹ 210 कोटींचे वीज बिल, कुठे घडली घटना?

व्हायरल सत्य काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बिल गेट्स यांचा नाही. हा व्हिडीओ 2024 मधील आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती बिल गेट्स नसून परदेशी पर्यटक आहे. काशीच्या मणिकर्णिका घाटावर हे परदेशी पर्यटक बसले होते. त्यावेळी कुणीतरी हा व्हिडीओ शूट केला होता. 24 डिसेंबरला 2024 ला तो गुल्लक नावाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला'.

मात्र आता महाकुंभमेळ्याची वेळ साधून हाच व्हिडीओ बिल गेट्स यांच्या नावाने व्हायरल करण्यात येतोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत महाकुंभमेळ्यात बिल गेट्स यांनी हजेरी लावून काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com