बुलढाणा: जिल्ह्यात दिवसेंदिवस मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ होत होती. या चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर होते. त्यासाठीच कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी एका विशेष पथकाला हे जिकरीचे काम सोपविले होते. (Bike theft racket exposed; Two accused were arrested along with 11 two-wheelers)
हे देखील पहा -
त्या पथकाने दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ११ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या आणखी दोन मोटारसायकली, २ मोबाईल्स असा एकूण ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष गोविंद वानखेडे (२८, रा. पिंप्री कोरडे, ता. खामगाव) व आकाश भगवान खरात (३०, रा. हिवरा खुर्द ता. मेहकर) अशी चोरट्यांची नावे आहेत. आज संतोषला उंद्री येथून “एलसीबी'च्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या जवळच्या दुचाकीबद्दल विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केल्यावर हिवरा खुर्द येथील आकाशच्या मदतीने त्याने अमडापूर, जानेफळ, मेहकर तसेच अकोला जिल्ह्यातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
त्यानुसार एलसीबी पथकाने हिवरा खुर्द येथून आकाशला सुद्धा ताब्यात घेतले. आकाशनेही त्याचा साथीदार संतोषच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.