ZP Election : मोठी बातमी! ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेची इथं झाली युती, राज्यातील पहिला प्रयोग

Thackeray Shinde alliance news : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र आली असून राज्यातील हा पहिला राजकीय प्रयोग ठरला आहे.
ठाकरे-शिंदे एकत्र येणार?
Uddhav Thackeray and Eknath ShindeSaam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Solapur Zilla Parishad election updates : राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजलेत. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांची जिल्हा परिषदेसाठी युती झाली आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत. राज्यातील या प्रयोगाचा राज्याच्या राजकारणात फरक पडणार का? याची चर्चा सोलापूरमध्ये सुरू आहे.

ठाकरे-शिंदे एकत्र येणार?
ठाकरेंच्या शिवसेनेचे ४ नगरसेवक नॉट रिचेबल, थेट पोलिसांमध्ये तक्रार, कल्याणमध्ये नेमकं काय चाललेय?

सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्या असून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. एकीकडे संजय राऊंतांनी शिवसेना शिंदे गटासोबत कदापि जाणार नाही अशी भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढत आहेत.

ठाकरे-शिंदे एकत्र येणार?
धक्कादायक! अकोल्यात आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण, झाडाला बांधून लाकडी दांड्याने आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण

उद्धव ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी आज होणाऱ्या मेळाव्याला येण्याचे आवाहन नागरिकांना केलेय. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलेय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत.

भाजपचा पराभव करण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडी स्थापन केली असून या युतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरे-शिंदे एकत्र येणार?
Accident : लग्नाआधी काळाचा घाला, नवरदेवाचा अपघाती मृत्यू, गर्लफ्रेंडसोबत होणार होतं लग्न

संजय राऊत काय म्हणाले ?

सोलापूरमधील बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने राजकारण ढवळून निघाले. यावर संजय राऊतांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "सोलापुरात दोन्ही शिवसेना एकत्र लढतायत हे अधिकृत नाही. उद्धव ठाकरे असा निर्णय घेणार नाहीत. काही घडलंय याची माहिती नाही. याबाबत आम्ही माहिती घेत आहोत." भाजपचा पराभव करण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून याला अधिकृत नसल्याचे म्हटलेय. ठाकरेंकडून आमदार सोपाल यांच्यावर कारवाई केली जाणार का? याचीही चर्चा बार्शीच्या राजकारणात सुरू आहे.

ठाकरे-शिंदे एकत्र येणार?
धक्कादायक! अकोल्यात आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण, झाडाला बांधून लाकडी दांड्याने आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com