Breaking : राज्य सरकारचा मोठा निर्णय; ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे उघडणार!

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
Breaking News : ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे उघडणार!
Breaking News : ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे उघडणार!साम टीव्ही न्यूज
Published On

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात जोरादार राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळाली. मंदिरे उघडण्यासाठी विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला अनेकदा धारेवर धरलं. 'मंदिरे उघडा' या मागणीला घेऊन राज्यभरात घंटानाद आंदोलने देखील भाजपकडून करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या मंदिरांपेक्षा आरोग्य मंदिरे महत्वाची असल्याची प्रतिक्रिया देखील दिली होती.

हे देखील पहा :

मात्र, आता राज्यभरातील मंदिरे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे भाविक-भक्तांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. सोबतच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.

Breaking News : ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे उघडणार!
UPSC परीक्षा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात अव्वल..!

मंदिर उघडण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, दुसऱ्या लाटेचा सामना केल्यांनतर, आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र, सावकाशपणे सर्व बाबींची काळजी घेऊन बऱ्यापैकी निर्बंधात आपण शिथिलता आणली आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीदेखील, आपण सावधगिरी बाळगणे आत्यंतिक आवश्यक आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करण्यात आली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी असणार आहे त्यांनी हे विसरू नये.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com