UPSC अर्थात भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला असून यामध्ये देशभरातून एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ५४५ पुरुष तर २१६ महिला उमेदवार आहेत. अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक असणाऱ्या या परीक्षेत देशातून शुभम कुमार हा विद्यार्थी अव्वल आला आहे. शुभम कुमार हा आयआयटी बॉम्बेमधून बी टेक सिव्हील इंजिनिअर आहे. तर जागृती अवस्थी हिने मुलींमधून अव्वल क्रमांक पटकावला असून एकूण उमेदवारांमध्ये तिचे स्थान द्वितीय आहे.
तर, जागृती अवस्थी हिने देशात द्वितीय तर मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. जागृती अवस्थीने MANIT भोपाळमधून बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.तसेच अंकिता जैन यांनी मुलींमधून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे IAS अधिकारी आणि २०१५ बॅचच्या टॉपर असणाऱ्या टीना डाबी यांची बहीण रिया डाबी हिने देखील UPSC परीक्षा उत्तीर्ण केली असून तिने देशात १५ वी रँक मिळवली आहे.
या निकालानुसार, टॉप २५ उमेदवारांमध्ये १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये २५ व्यक्ती अपंगत्व असलेल्या (०७ ऑर्थोपेडिकली अपंग, ०४ दृष्टिहीन आव्हान, १० श्रवणदोष आणि ०४ अनेक अपंग) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून विनायक कारभारी या विद्यार्थ्याला देशात ३७ वा रँक मिळाला आहे.
पुण्यातून अंध विद्यार्थिनी उत्तीर्ण :
या परीक्षेत अंध विद्यार्थिनी पूजा कदम ने देखील यश संपादन केले असून देशात ५७७ वी रँक प्राप्त केली आहे.
या परीक्षेसाठी जानेवारी 2021 मध्ये लेखी आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मुलाखती झाल्या होत्या. यामधून
263 जनरल
86 ईडब्ल्यूएस
229 ओबीसी
122 एससी
61 एसटी
असे एकूण 761 जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी
180 आयएएस,
आयएफएस 36,
आयपीएस 200,
अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302,
ब गटातील प्रशासकीय सेवा 118
अश्या निवडी करण्यात आल्या आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.