अहमदनगर ः कोकणानंतर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुसळधार वृष्टी सुरू आहे. या भागात झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यालाच नव्हे तर मराठवाड्यालाही याचा फायदा होतो. जायकवाडी धरणात याच पाणलोटक्षेत्रातून पाणी जाते. मुळा आणि भंडारदरा ही मोठी धरणे अकोल्यातील पावसावर अवलंबून असतात.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणात ८० टक्के (१०५०० दलघफू) पाणीसाठा झाला आहे. सतत पाऊस पडत असल्यास धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवला जातो. धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे अंब्रेला फॉल सुरू झाला आहे. हा धबधबा अकोल्यातील निसर्ग सौंदर्यात भर घालतो. हा पर्यटकांसाठी तो आकर्षण असतो.Bhandardara dam is 80 percent full and Mula dam is 50 percent full
गंगापूर, दारणातूनही विसर्ग
निळवंडे धरणाची क्षमता ८३२० दशलक्ष घनफूट आहे. तेही धरण ४० टक्के भरले आहे. मुळा धरण निम्म्यावर आले आहे. या धरणातील पाणीसाठा १४५५० दशलक्ष घनफुटांवर गेला आहे. गंगापूर धरणातून कालपासून ३०३८ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा गोदावरी नदीत सुरू आहे. दारणा धरणातून ५५४० तर नांदूर मधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे.Bhandardara dam is 80 percent full and Mula dam is 50 percent full
कुकडीतही लक्षणीय साठा
दुसरीकडे कुकडी प्रकल्पातही संततधार सुरू आहे. त्या धरणातील साठाही ५०.५२ टक्के झाला आहे. कुकडीच्या डिंभे धरणाची क्षमता १३ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. नवीन पाण्याची आवक झाल्याने तेथील पाणीसाठा १००३७ दशलक्ष घनफूट (७२.५०) टक्के झाला आहे. माणिकडोहमध्ये ४१७१, चिल्हेवाडीत ७२५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. ते धरण ८० टक्के भरले आहे. पिंपळगाव जोगे धरण प्लसमध्ये आले आहे. येडगावात २११८ (८३ टक्के), वडजमध्ये ७७९ दशलक्ष घनफूट (५८) टक्के पाणीसाठी झाला आहे.
Edited By - Ashok Nimbalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.