Bhandara Accident : आईच्या डोळ्यादेखत चिमुकल्याचा मृत्यू; अंगणात खेळत असताना भरधाव गाडीने उडविले

Bhandara News : दुर्वाश हा अंगणात खेळत असताना आंधळगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव चार चाकी गाडीने दीड वर्षीय दुर्वाशला जोरदार धडक दिली. यात दुर्वाश हा फुटबॉलसारखा दूरवर फेकला गेला
Bhandara Accident
Bhandara AccidentSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: आई काम करत असताना आपल्या दीड वर्षीय मुलगा अंगणात खेळत होता. याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या गाडीने चिमुकल्याला जोरदार धडक देत उडविले. यात या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मुलाचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने आईने एकच टाहो फोडत मन हेलावणारा आक्रोश केला. सदरची घटना भंडारा जिल्ह्यातील सकरला येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे. 

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील साकारला येथील दुर्वाश डोये या दीड वर्षीय चीमुकलचा अंगणात खेळत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्वांश याची आई काम करत असताना तिच्या बाजूलाच मुलगा खेळत होता. दुर्वाश हा अंगणात खेळत असताना आंधळगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव चार चाकी गाडीने दीड वर्षीय दुर्वाशला जोरदार धडक दिली. यात दुर्वाश हा फुटबॉलसारखा दूरवर फेकला गेला. 

Bhandara Accident
Ahilyanagar Crime : दारू पिऊ देण्यास विरोध; टोळक्याचा हॉटेलवर हल्ला, पाच जण जखमी

गाडीच्या धडकेत दूरवर फेकला गेल्याने दुर्वाश डोये या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेने दुर्वाश याच्या आईला जबर धक्का बसला असून चिमुकल्याच्या मृत्यू झाल्याने आईने एकच टाहो फोडला. दूर्वांश याचा मृतदेह छातीशी लागून आईचा सुरु असलेल्या आक्रोश पाहून परिसरातील घटनास्थळी जमा झालेल्या सर्वांचेच काळीज पिळवटून जात होतं. 

Bhandara Accident
Nandurbar Fire : वनव्याने संसाराची राखरांगोळी; जळालेले घर पाहून आदिवासी कुटुंबाचे अश्रू अनावर

त्या गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

दरम्यान अपघातानंतर गाडी चालक फरार झाला आहे. तर चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पुढील तपास आंधळगाव पोलीस करत आहेत. दरम्यान घटनेनंतर साकारला या गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com