शुभम देशमुख
भंडारा : सुगंधित सुपारी, तंबाखू विक्री व वाहतुकीस बंदी असताना याची सर्रासपणे तस्करी केली जात असते. अशाच प्रकारे सुगंधित तंबाखूची तस्करी करणारे वाहन उपविभागीय पोलिस विभागाच्या पथकाने पाठलाग करत पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उपविभागीय पोलिस विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर साकोली तालुक्यातील (Bhandara) सानगडी येथील नवेगाव बांध फाट्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. गाडी मध्ये सुगंधीत तंबाखू नवेगाव/बांध कडून सानगडी कडे येत आहे, अशी माहिती मिळाली होती. या माहितीनुसार कार आली असता सदरची गाडी थांबवून गाडीची तपासणी केली. गाडीच्या डिक्कीमध्ये सुगंधित तंबाखूचे ३० बोरी माल मिळाला. हा (Police) पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाडी मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन ८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गाडी चालक मुनेश्वर ताराम (वय ३२, रा.नवेगाव/बांध) व मालक देवेश पटेल (वय ४०, नवेगाव/बांध) यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा दाखल करून माल आणि गाडी पोलीस स्टेशन जमा केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.