Bhandara News
Bhandara NewsSaam tv

Bhandara News: घरभाड्याअभावी पोलीस चौकी झाली जनावरांचा गोठा

घरभाड्याअभावी पोलीस चौकी झाली जनावरांचा गोठा
Published on

भंडारा : ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दूरवरच्या गावांमध्ये पोलीस (Police) चौकीच्या माध्यमांतून नियंत्रण केले जाते. मात्र हीच पोलीस चौकी जेव्हा गुरांचा गोठा होतो; तेव्हा गावकऱ्यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी असा प्रश्न निर्माण होतो. असाच प्रकार भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील केसलवाडा पवार या गावामध्ये बघायला मिळत आहे. (Maharashtra News)

Bhandara News
Onion Market: नंदूरबार जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी नवीन बाजारपेठ

भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा पवार या गावात २०१८ मध्ये तत्कालीन ऊर्जा मंत्री व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थित या चौकीचे उद्घाटन करण्यात आले होते. काही महिने ही पोलिस चौकी चांगली चालली. मात्र काही महिन्यातच ही चौकी बंद झाली व गावकऱ्यांना सुवेवस्थेची समस्या उद्‌भवू लागली.

Bhandara News
Nashik News: धक्कादायक..नाशिकमधील ४२ अल्पवयीन मुली, १६७ तरुणी बेपत्ता; चार महिन्‍यातील आकडेवारी

घरभाडेही थकले

ही चौकी ज्या घरी लावण्यात आली होती. त्या घर मालकाला अद्याप घरभाडे मिळालेले नाही. तसेच गावातील तक्रारी देण्यासाठी १२ किमी लांब प्रवास करत लाखनी या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे आता घर भाड्याअभावी गोठा झालेली पोलीस चौकी ही नियमित शिपाई देऊन पूर्ववत करावी; अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com