Bhandara Accident: मोबाइल खरेदी केला अन् गावाकडे निघाले, पण वाटेतच घडला अनर्थ; दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Truck And Bike Accident In Bhandara: मोबाईल खरेदी करून आनंदामध्ये घराकडे परत येत असताना काळाने घाला घातला. रस्ते अपघातामध्ये दोन मित्रांचा मृत्यू तर तिसरा जखमी झाला आहे.
Bhandara Accident: मोबाइल खरेदी केला अन् गावाकडे निघाले, पण वाटेतच घडला अनर्थ;  दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Truck And Bike Accident In BhandaraSaam Tv
Published On

शुभम देशमुख, भंडारा

मोबाईल विकत घेऊन गावाकडे परत जात असताना मित्रांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा मित्र किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. अपघातामध्ये जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मित्रासाठी मोबाईल खरेदी करण्यासाठी तिघे मित्र दुचाकीवरून गेले होते. माबाईल खरेदी केल्यानंतर ते परत आपल्या गावाकडे येत होते. यावेळी वाटेतच रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा किरकोळ जखमी झाला. जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डोळ्यासमोरच आपल्या दोन्ही मित्रांनी जीव सोडल्याचे पाहून अपघातामध्ये बचावलेल्या तरुणाला मोठा धक्का बसला.

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना भंडारा - पवनी राष्ट्रीय महामार्गावरील अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव या गावाजवळ सोमवारी संध्याकाळी घडली. प्रवीण कुडमते (25 वर्षे) आणि रोहित कोडापे (23 वर्षे) अशी मृत मृतकांची नावं असून सचिन उके हा तरूण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर- जालना महामार्गांवरील मेरा फाट्यावर भीषण अपघात झाला. सोमवारी सायंकाळी भरधाव एसटी बसने दुचकीला पाठीमागून धडक दिली. मेरा खुर्द फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गभीर जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com