Beed Water Shortage: शेतकऱ्यांसह नागरिकांसमोर मोठं संकट; बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यात भीषण पाणीटंचाई

Beed Water Shortage Possibility: यंदा जिल्ह्यातील आकराही तालुक्यात पाणी टंचाई भासणार आहे. तर या ११ तालुक्यातील तब्बल ९५६ गावे पाणी टंचाईग्रस्त म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी घोषित केली आहेत.
Beed Water Shortage
Beed Water ShortageSaam tv
Published On

विनोद जिरे

Beed News:

बीड जिल्ह्यात यंदा पाऊस न झाल्याने दुष्काळ जाहीर झालाय. अशात पाणी टंचाईचे ढग आतापासून अधिक गडद बनत चालले आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील आकराही तालुक्यात पाणी टंचाई भासणार आहे. तर या ११ तालुक्यातील तब्बल ९५६ गावे पाणी टंचाईग्रस्त म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी घोषित केली आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Water Shortage
Uttar pradesh Crime News: खळबळजनक! रोजच्या छेडछाडीला कंटाळली, युवकाला घरी बोलावून महिलेने केलं भयकंर कृत्य

या गावांसाठीचा आराखडा तयार करून राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानुसार सरकाररडून आर्थिक तरतूद केली जाणार आहे. असे असले तरी पावसाअभावी शेतकऱ्यांसह नागरिकांसमोर पाण्याचं मोठं संकट उभं ठाकलंय.

दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केलेत?

1) अंबाजोगाई - १०७

2) आष्टी - ३६

3) बीड - १८९

4) धारूर - ६९

5) गेवराई - १५५

6) केज - ६६

7) माजलगाव - ७६

8) परळी - १०४

9) पाटोदा - ५७

10) शिरूर कासार - ७७

11) वडवणी - २५

असे एकूण ९५६ गावे पाणी टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

दुष्काळी जिल्ह्यांच्या दुसऱ्या यादीसाठी २९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय होणार

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील दुष्काळी तालुक्यांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यासाठी लवकरच बैठक होणार असून सरकार गतिमान पद्धतीने निर्णय घेत दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करत आहेत.

विमा कंपन्यांकडून आग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात झाली असून दुष्काळी भागातील उपाययोजना सुरुवात झालेली आहे. सरकारने अगोदर घोषित केलेल्या दुष्काळी तालुक्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळी परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या सर्व मदती सरकारकडून दिल्या जाणारा असून सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

राज्यात अनेक ठिकाणी हवा तसा पाऊस कोसळा नाही. दिवळीच्या काही दिवस आधी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. मात्र तेव्हाही बऱ्याच ठिकाणी तुरळक पाऊस बरसला. पाऊस व्यवस्थित न झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Beed Water Shortage
Pune Crime News: पुण्यात गुंडांचा धुडगूस.. पार्किंगमधील दुचाकी जाळल्या; वारजे परिसरातील धक्कादायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com