Satish Bhosale: बीडमध्ये 'नवा कराड', अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर, मुंडेंनंतर धसांचा कार्यकर्ताही गुंड, एवढा माज कुठून येतो?

Beed’s Lawlessness: सरपंच देशमुखांच्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये आणखी एक अमानुष मारहाणीचा व्हिडीओ समोर आलाय.. त्यामुळे बीडमध्ये नवा कराड उदयाला येत असल्याचं चित्र आहे..पण हा नवा कराड कोण आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Beed violence
Beed violenceSaam Tv
Published On

ही अमानुष मारहाण आणि ही गुंडागर्दी आहे बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बावी गावातील... भाजप पदाधिकारी सतिश भोसले उर्फ खोक्या एका व्यक्तीला नग्न करुन अत्यंत निर्दयीपणे त्याच्या पार्श्वभागावर बॅटने फटके मारतोय.. या मारहाणीत दिलीप ढाकणेंचे 8 दात पडलेत तर महेश ढाकणेचा पाय निकामी झालाय... हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणखी एका व्यक्तीने रक्तबंबाळ अवस्थेत पोलिसांमध्ये खोक्या भोसलेविरोधात तक्रार दाखल केलीय... मात्र सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्याचा माज इथेच संपत नाही... तर खोक्याचे आणखीही कांड समोर आलेत..

Beed violence
Pune News : स्वारगेट अत्याचार प्रकरण; तरुणीनं केलेला प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज कोर्टाने फेटाळला

पैशांचा माज दाखवत खोक्या गाडीत पैसे उधळत असल्याचंही समोर आलंय.. एवढंच नाही तर हाच खोक्या उजळ माथ्याने हेलिकॉप्टरमधूनही फिरत असल्याचं समोर आलंय.. कराड गँगला फैलावर घेणाऱ्या आमदार सुरेश धसांचाच खोक्या भोसले हा कार्यकर्ता असल्याचं समोर आल्यानं धसांना ते जाहीरपणे मान्य करावं लागलं. आणि अंजली दमानियांनी यामुद्यावरून थेट मुख्यमंत्र्यानाच इशारा दिलाय

या प्रकारानंतर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मात्र बीड जिल्ह्यातील गुंडागर्दीच्या आणि अमानुष मारहाणीच्या घटना महाराष्ट्रातील प्रत्येकाचं हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत...सर्वसामान्य लोकांवर दहशत बसवणं, माजोरडेपणा करत अमानुष मारहाण करतानाचे व्हिडीओ काढणं आणि त्याच माजात पैसे उधळणं यासारखे कृत्य करण्याइतकं निर्ढावलेपण येतं कुठून?

Beed violence
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ 'खोक्या'च्या अडचणीत भर; अमानुष मारहण करणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा

मारहाणीचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतरही खोक्याला अटक का नाही? पोलीस प्रशासन अशा गुंडांना पायबंद का घालत नाही? स्थानिक आमदाराच्या पाठबळाशिवाय अशी विषवल्ली पसरु शकते का? जनतेच्या जीवावर उठणाऱ्यांना राजकीय पक्ष पदं कशी देतात? या भोसलेचा आका कोण? आणि बीडमधल्या अशा अनेक गुंडांच्या आकाचं काय असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com