Beed News: गाढ झोपेत असतानाच सापाने दंश केला,बहिण-भावाचा जागेवरच मृत्यू; बीडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Beed News: बीडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीडमधील कोयाळ गावात सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील दोन सख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला आहे.
Snake Bite
Snake BiteSaam tv
Published On

योगेश काशीद, साम टीव्ही प्रतिनिधी

बीडमध्ये (Beed News) काळीज पिळवटवून टाकणारी घटना घडली आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील कोयाळ गावात सर्पदंशामुळे एका कुटुंबातील सख्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दूर्दैवी आहे. यामुळे आजाबूजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Snake Bite
Beed: ट्रॅक्टरवरून वाद टोकाला! ५ जणांना कुऱ्हाड, लाठ्या अन् दगडानं ठेचलं; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

धारुरमधील कोयाळ गावात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 24 मे रोजी मध्यरात्री 12 ते 01 वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली आहे. घरातच या दोघांचा मृत्यू झाला आहे.

प्रदीप मुंडे यांची 07 वर्षांची मुलगी कोमल आणि 05 वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व त्याने दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांनीही प्राण सोडले. आपल्या दोन्ही मुलांचा जीव गेल्याने आईवडिलांनी आक्रोश केला आहे.

Snake Bite
Beed Crime : शिवराज दिवटे मारहाण प्रकरण; समाधान मुडेंच्या गँगला मोक्का लावा अन्यथा..., परळीत नागरिक आक्रमक

या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. मुंडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एका घरातील २ निष्पाप जीवांचा गेलेला बळीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रात्री ही दोन्ही मुले झोपेत होती. अचानक घरात साप शिरला आणि त्यांच्या अंगावर बसला. त्यानंतर त्याने या दोन्ही मुलांना दंश केला. हा साप विषारी असल्यामुळे रुग्णालयात नेताच त्यांचा मृत्यू झाला. ७ वर्षाची मुलगी अन् ५ वर्षांचा मुलगा गेल्याने आईवडिलांना खूप दुःख झाले आहे.

Snake Bite
Beed Crime: बीडमध्ये गुंडाराज सुरूच! संतोष देशमुखांनंतर पवनचक्की वादातून पुन्हा गोळीबार, एकाचा मृत्यू| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com