आई मागे आवाज देत राहिली..अन्‌ 250 फूट खोल दरीत उडी घेऊन मुलाची आत्महत्या

आई मागे आवाज देत राहिली..अन्‌ 250 फूट खोल दरीत उडी घेऊन मुलाची आत्महत्या
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : आत्महत्या करण्यासाठी घरातून धावत सुटलेल्या 20 वर्षीय मुलाच्या पाठीमागे आई थांब थांब करत धावत होती. या दरम्यान मॉर्निंग वॉकला आलेल्या पत्रकारांनी त्याला अडवून समजून काढून माघारी पाठवले. मात्र त्यानंतर त्याने आईच्या डोळ्यासमोरच जवळपास 250 फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही मन सुन्न करणारी हृदयद्रावक अन्‌ धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाई (Ambajogai) शहरात घडली आहे. (Letest Marathi News)

Beed News
Solapur Accident News : उसाने भरलेली ट्रॉली अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

दिनेश रमेश लोमटे (वय 20 रा. कोष्टी गल्ली अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेशने आत्महत्या (Beed News) करण्यापूर्वी पत्रकार बंधू त्यांची समजून काढतानाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय. मयत दिनेश लोमटे हा पहाटेच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घरातून मुकुंदराज परिसराकडे धावत सुटला होता. त्याला रोखण्यासाठी आईही विनवणी करत मागे धावत होती. पण दिनेशवर काहीही परिणाम झाला नाही. आईसाठी त्याच्या मनाला पाझर फुटला नाही. तो धावतच होता. पुढे मॉर्निंग वॉकसाठी आलेले पत्रकार दत्ता आंबेकर, अशोक दळवे, बालाजी खैरमोडे, मारुती जोगदंड यांनी हा प्रकार पाहून दिनेशला थांबवून समजूत काढून शांत केले.

पाठ फिरताच त्‍याने मारली उडी

आईजवळ आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करून पत्रकार बंधु पुढे गेले. अन् मागे त्याने पुन्हा पळत जाऊन अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरातील व्ह्यू पॉइंटवरुन जवळपास 250 फूट खोल दरीत आईच्या डोळ्यांदेखत उडी घेतली. हे पहाताच आईनं हंबरडा फोडला. दरीत उतरून पाहिले तोपर्यंत दिनेशचा मृत्यू झाला होता. त्यांनतर घटनेची माहिती अंबाजोगाई पोलीसांना देण्यात आली. दरम्यान 20 वर्षांच्या दिनेश या तरुणाने आई मागे धावत असतानाही आपल्या जन्मदातीच्या डोळ्यांदेखत हा टोकचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात असून मन सुन्न झाले आहे. दरम्यान दिनेशने आत्महत्या का केली ? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com