Beed News: दुर्दैवी घटना..विद्युत पंप विहिरीत सोडतांना पाय घसरला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

दुर्दैवी घटना..विद्युत पंप विहिरीत सोडतांना पाय घसरला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : शेतात असलेल्या विहीरीत विद्युत पंप सोडत असतांना पाय घसरून पडल्याने १६ वर्षीय मुलांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. संदिप बारीकराव खाडे असे मृत झालेल्‍या मुलाचे नाव आहे. (Letest Marathi News)

Beed News
Pandharpur : माघी यात्रेसाठी पंढरपुर सज्ज; विठ्ठल मंदिर सजले, पाेलिस यंत्रणा सतर्क

बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली येथील पांडुरंग भोजीबा खाडे हे पुतण्या संदीपला सोबत घेऊन शेतातील विहिरीत विद्युत पंप सोडण्यासाठी गेले होते. मात्र विहिरीला कठडे नसल्याने विद्युत पंप सोडतांना अचानक पाय घसल्याने तोल जाऊन विहीरीत पडल्याने संदिपचा दुर्दैवी मुत्यू झाला. ही घटना घडताच चुलत्याने आरडाओरड केली. पण पोहता येत नसल्याने त्याचा मुत्यू झाला. तर घटनेची माहिती कळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

आजीनेच केला होता सांभाळ

दरम्यान संदीपला ना वडिलांचे प्रेम ना आईची माया मिळाली. वडील भोळसर असल्याने ते बाहेरच असतात. तर कौटुंबिक वादातुन घरातुन आई निघून गेलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संदीपचा सांभाळ आजी करत होती. तो आजीला मदत करत असायचा. जवळ वडिल ना आई होती, आजोबा मयत झाले. आजीची काठी असलेला आधार गेल्याने तिच्यावर दुखांचा डोंगर कोसळला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com