बीड : बीड जिल्ह्यातील सिंदफणा काठच्या १४० गावांसाठी नाथसागरातील पाणी सोडावे. या मागणीसाठी आता ग्रामस्थांनी लढा उभारला आहे. यासाठी गावोगावी बैठकांचे आयोजन केले जात असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली जाणार आहे.
बीड (Beed News) जिल्ह्यातील पैठण येथील नाथसागरातील पाणी अंडरग्राउंड पाईप लाईनद्वारे सिंदफणा नदीपात्रात सोडल्यास १४० गावांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. यासाठी ३० किलोमीटरची पाईपलाईन करणे गरजेचे आहे. याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी हा लोकलढा उभारला जात आहे.
तर ५० हजार गावकरी काढणार मोर्चा
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये याच प्रश्नावर उपोषण देखील करण्यात आले. दरम्यान आता शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाणार आहे. त्यानंतरही या प्रश्नावर कुठलीही सकारात्मक कार्यवाही न झाल्यास थेट रस्त्यावर उतरून ५० हजार गावकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील या समितीने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.