Beed News
Beed NewsSaam tv

Beed News: दानपेटी शेजारी स्त्री जातीच्या अर्भकाला ठेवून माता पसार

दानपेटी शेजारी स्त्री जातीच्या अर्भकाला ठेवून माता पसार
Published on

बीड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या (Beed) पाली येथील इन्फंट इंडिया या प्रकल्पाच्या दानपेटी शेजारी एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला ठेवून माता पसार (Crime) झाली. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान समोर आली आहे. (Letest Marathi News)

Beed News
Maharashtra Winter session : आक्रमक विरोधकांना रोखण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार

इन्फंट इंडियाचे संचालक बारगजे कुटुंबीय (Voting) मतदानावरुन परत येताना सायंकाळी सहाच्या सुमारास ते इन्फंट इंडियाला परतले. यावेळी रस्त्यावरील एका दानपेटी शेजारी त्यांना ही चिमुकली आढळून आली. या चिमुकलीला जिल्हा रुग्णालयातील (Doctor) डॉक्टरांनी तपासले असता सध्या तिची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.

अज्ञात मातेविरूद्ध गुन्‍हा

सदरच्‍या स्‍त्री जातीच्‍या अर्भकाला टाकून गेल्‍या प्रकरणी अज्ञात माते विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पोलीस निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com