बीड : जिल्हा प्रशासनाच्या वृक्ष लागवड लोक चळवळ मोहिमेचा इव्हेंट मनोवृत्तीच्या निषेधार्थ बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Beed Collector) सामाजिक कार्यकर्त्यांनी दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन केले. आंदोलकांनी या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले. (Beed Today News)
जिल्हा प्रशासनाकडून तोडण्यात आलेल्या झाडाजवळ दिवे लावून या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्यातील वृक्ष लागवड संदर्भात खर्चाचे ऑडिट करा, वनविभागातील आणि रोहयो अंतर्गत वृक्ष लागवड गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करा, या बरोबरच शासकीय परिसरातील वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा. या प्रमुख मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.