Manjra Dam
Manjra DamSaam tv

Manjra Dam : मांजरा धरणात आता १० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; अनेक भागात मोठ पाणीसंकट

Beed News : मांजरा धरणाच्या परिसरातील बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यातील अनेक गावं याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
Published on

बीड : पाण्याचे मोठे संकट आता बीड जिल्ह्यात उभे आहे. बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणामध्ये अवघा १.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आता पुढील १० ते १२ दिवस पुरेल इतकाच हा जिवंत पाणीसाठा असून यामुळे आता बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यावर पाणी संकट ओढावल आहे. 

Manjra Dam
Nagpur Fraud Case : डुप्लिकेट कुलर बनवून व्यवस्थपकाने कंपनीची केली फसवणूक; मध्यप्रदेश, राजस्थानच्या विक्रेत्यांवरही गुन्हा दाखल

बीड (Beed) जिल्ह्यात यंदा पाऊस झाला नसल्याने दुष्काळ आहे. जिल्ह्यात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि चाऱ्याचीही सोय करावी, अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांमधून केली जात आहे. यात बीड जिल्ह्यातील (Manjra Dam) मांजरा धरणातील पाणीसाठा कमी होत केवळ १.३७ टक्के राहिल्याने आगामी काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

Manjra Dam
Saam Impact News : बुलढाणा, लातूरमध्ये होल्डिंग स्ट्रक्चर काढण्यास सुरुवात

मांजरा धरणाच्या परिसरातील बीड, (Dharashiv News) धाराशिव, लातूर जिल्ह्यातील अनेक गावं याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्याचबरोबर शेतीला आणि जनावरांना देखील याच धरणाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. मात्र आता धरणातच अवघा १.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने या तीन जिल्ह्यातील अनेक भागांवर पाणी संकट ओढावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com