जीप- ट्रकचा भीषण अपघात; 2 जण गंभीर जखमी, जीपचा चक्काचूर

जीप- ट्रकचा भीषण अपघात; 2 जण गंभीर जखमी, जीपचा चक्काचूर
Accident News
Accident NewsSaam tv
Published On: 

बीड : बीडच्या केज- कळंब महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. हा अपघात (Beed) बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या साळेगाव परिसरात झाला. (beed news Jeep truck accident two seriously injured)

साळेगाव परिसरात बोलेरो जीप (क्र. एमएच- 20, डिजे- 9563) या गाडीला ऊस बॅगसची वाहतूक करणाऱ्या ट्रक (क्र. एमएच 09, सीए 4590) ने समोरून जोराची (Accident) धडक दिली. यात बोलेरो जीप चालक सोनू अन्सारी शेख (वय 25), नशीर बशीर शेख (वय 36) दोघे रा. थेटेगव्हाण (ता. धारूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर (Latur) येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालक रविंद्र महादेव रुपनर (रा. नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर) याच्यासह अपघातातील ट्रक केज पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.