Beed: सिंदफना नदीने बदलले पात्र; ७ एकर शेती पिकांसह गेली वाहून, शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू

सिंदफना नदीने बदलले पात्र; ७ एकर शेती पिकांसह गेली वाहून, शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

बीड : एकीकडे दिवाळीचा उत्सव सुरू असतांना दुसरीकडे मात्र अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. बीडच्या (Beed) कुर्ला, औरंगपूर व गावच्या शिवारातून वाहणाऱ्या सिंदफना नदीने पात्र बदलल्याने उभ्या पिकांसह जवळपास 7 एकरवरील जमिनी वाहून गेल्या आहेत. (Tajya Batmya)

Beed News
Jalgaon: रात्री आरामासाठी थांबलेल्‍या ट्रक क्‍लीनर तरुणाची आत्महत्या

सिंदफना नदीवरील औरंगपूर शिवारातील केटीवेअर बंधाऱ्यालगत नदीने पात्र बदलले आहे. यामुळे औरंगपुरच्या कल्याण उनवणे, जिजाबाई श्रीरंग उनवणे, संजय घोडके यांच्यासह 10 ते 12 शेतकऱ्यांची (Farmer) जमीन वाहून गेली आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नाही. गतवर्षी कल्याण उनवणे यांची विहीर वाहून गेली होती. तर दोन दिवसांपूर्वी त्यांचा बोरही वाहून गेला. यंदा झालेली अतिवृष्टी (Heavy Rain) त्यांच्या जवळपास 30 फूट जमीनीला देखील नदीचे रूप आले आहे. त्यामुळे आता कुठे पेरावे? जगावं कसं? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे.

महिला शेतकरीचे अश्रू अनावर

लोकांची व्याज व्यवहारी करून पाच एकर जमीन घेतली. मात्र त्यापैकी जवळपास 3 एकर जमीन वाहून गेली. या जमिनीला नदीचे स्वरूप आले. यामुळे आमच्या कुटुंबांने जगावं कसं ? कुठे पेरावे? असा प्रश्न आहे. अशी आपली व्यथा सांगताना महिला शेतकरी जिजाबाई उनवणे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com