नात्याला काळीमा.. आजोबाने केला दहा वर्षीय नातीवर अत्याचार

नात्याला काळीमा.. आजोबांने केला दहा वर्षीय नातीवर अत्याचार
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv
Published On

बीड : घरात कोणी नसताना दहा वर्षीय चिमुकलीवर आजोबाने अत्‍याचार केला. नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना बीड (Beed) जिल्‍ह्यात समोर आली आहे. अत्‍याचार करणाऱ्या आजोबाला फरार असून आरोपीचा पोलीस (Police) शोध घेत आहेत. (Beed Today News)

Beed Crime News
Crime: शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात डोक्यात कुऱ्हाड घालून खून

बीडच्या माजलगाव (Majalgaon) तालुक्यात असणाऱ्या दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना समोर आली आहे. एका 62 वर्षीय आजोबाने त्याच्या 10 वर्षीय अल्पवयीन नातीवर अत्याचार केला. आई शेतात गेल्याचा गैरफायदा घेत आजोबाने घरात शिरत अल्पवयीन नातीवर अत्याचार केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

चिमुकलीने आईला सांगितली आपबिती

पीडित चिमुकलीने घडलेली आपबिती आई घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने दिंद्रुड पोलीस ठाणे गाठत मुलीसोबत घडलेली कैफियत मांडली. यावरून आरोपी नराधम आजोबावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com