Majalgaon News : माजलगावात जिनिंगला भीषण आग; कापसाच्या गाठी जळून खाक

Beed News : अचानक लागलेल्या या आगीने लागलीच रौद्ररूप घेतले. यामुळे जिनिंगमधील कापूस व कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर जिनिंग मधील साहित्य देखील जाळून खाक झाले आहे.
Majalgaon News
Majalgaon NewsSaam tv

बीड : बीडच्या माजलगाव शहरातजवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथील कुनाल जिंनिगला भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. (Beed) या आगीत जिनिंगमध्ये साठवून ठेवलेला (Cotton) कापूस व कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Live Marathi News)

Majalgaon News
Dhule MNS : शिवजयंती दिनी असलेला सीबीएससी बोर्डाचा पेपर रद्द करा; मनसे आक्रमक

बीडच्या माजलगाव (Majalgaon) शहराजवळ असलेल्या फुले पिंपळगाव येथील कुणाल जिंनिगला आज दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या (Fire) आगीने लागलीच रौद्ररूप घेतले. यामुळे जिनिंगमधील कापूस व कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर जिनिंग मधील साहित्य देखील जाळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवित हानी टळली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Majalgaon News
Vasai Virar News : अवैध बांधकामावर कारवाई करत नसल्याने पालिकेचा केला अंत्यविधी; तरुणाचे तिरडीवर झोपून आंदोलन

अग्निशमन बंबाने आग विझविण्याचा प्रयत्न 

जिनींगला आग लागताच धावपळ सुरु झाली. जिनिंगमध्ये असलेल्या काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र कापूस असल्याने आगीने रौद्ररूप धारण केला. याबाबतची माहिती (Fire Brigade) अग्निशमन दलाला दलविण्यात आली. अग्निशमन बंब येथे दाखल झाले असून याच्या माध्यमातून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली. तसेच आगीत झालेल्या नुकसानीचा आकडा किती आहे? हे अद्याप अस्पष्ट झालेले नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com