Beed: रंगला अश्व रिंगण सोहळा; संतश्रेष्ठ नामदेव महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

रंगला अश्व रिंगण सोहळा; संतश्रेष्ठ नामदेव महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत
Ashadhi Wari
Ashadhi WariSaam tv
Published On

बीड : हिंगोली जिल्ह्यातील नर्सिंनामदेव महाराज पालखीचे बीडच्या जवळबन येथे आज सकाळी वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मराठवाड्यातील (Ashadhi Wari) ग्रामीण भागातील पहिला अश्व रिंगण सोहळा जवळबन गावात संपन्न झाला आहे. (Beed news ashadhi wari Welcome to Santshrestha Namdev Maharaj Palkhi)

Ashadhi Wari
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा तळतळाट सरकारला लागला; जल्‍लोष करत एसटी कर्मचाऱ्यांचे मत

गावातील (कै.) निवृत्त सोपानराव करपे यांनी 1995 साली संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या दिंडीची गावात (Beed News) सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे. कोरोनाच्या (Corona) दोन वर्षाच्या खंडानंतर आज गावात दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले आहे. यामुळे गावात चैतन्‍यमय वातावरण निर्माण झाले आहे.

युसुफवडगाव येथे मुक्‍काम

फुगडी, वारकऱ्यांचे रिंगण अश्या विविध कार्यक्रमाने गावकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे. यामुळे गावात अगदी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील हनुमान मंदिरात कीर्तन, भजन करून महाप्रसाद घेऊन ही पालखी पुढे युसुफवडगाव येथे मुक्काम करणार असून शुक्रवारी पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार असल्याची माहिती वारकऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com