Beed Accident News
Beed Accident NewsSaam tv

Beed Accident News: थरकाप उडवणारा अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

थरकाप उडवणारा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
Published on

बीड : बीड जिल्ह्यात काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात (Accident) समोर आलाय. अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही अपघाताची घटना बीडच्या (Beed) माजलगाव गढी महामार्गावर घडली आहे. (Maharashtra News)

Beed Accident News
Kalyan News: पादचारी पुलावर माथेफिरूचे धक्कादायक कृत्य; कल्याण रेल्वे स्टेशनवरील घटनेने तरुणी भेदरली

विकास रामदास खरात (वय 32 रा. केसापुरी) असं मयत दुचाकीस्वराचे नाव आहे. विकास हा तरुण गढीवरून दुचाकीने माजलगावकडे येत होता. या दरम्यान केसापुरी कॅम्प परिसरात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये विकास खरात याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. दरम्यान या प्रकरणी अज्ञात वाहनावर आणि चालकावर बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Accident News
Nandurbar News: ईडीच्या विरोधात नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला

अपघात इतका भीषण होता, की पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोकाच वाढला. मयत दुचाकीस्वार गाडीवरच पडल्याचं दिसून आला तर खाली अक्षरशः रक्ताचा सडाचं पडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com