Beed Lok Sabha : बीडमध्ये शरद पवारांची यशस्वी खेळी; पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणे काय? तर सोनवणेंना कोणाची साथ मिळाली?

beed lok sabha constituency : बीडमध्ये शरद पवारांची यशस्वी खेळी ठरली. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. मुंडे यांच्या पराभवाची कारणे जाणून घेऊयात.
बीडमध्ये शरद पवारांची यशस्वी खेळी; पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणे काय? तर सोनवणेंना कोणाची साथ मिळाली?
Beed Lok Sabha Saam tv

बीड : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला. पंकजा मुंडे यांना सहा हजारांहून अधिक मतांनी पराभवाला सामोरे जावं लागलं.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना परभवाला सामोरे जावं लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ६५८५ मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. बीडमध्ये मुंडे विरुद्ध सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत चुरस पाहायला मिळाली. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये मिळालेल्या मतामुळे पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.

बीडमध्ये शरद पवारांची यशस्वी खेळी; पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणे काय? तर सोनवणेंना कोणाची साथ मिळाली?
Celebrities Who Won Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत सेलिब्रिटींचा दबदबा; कोणत्या जागेवरून कोणता तारा चमकला?

मुंडे यांच्या परभवाची कारणे काय?

मराठा आरक्षणाचा प्रश्न बीड जिल्ह्यात सर्वात प्रबळ ठरल्याचे पाहायला मिळाला, पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे हे महत्वाचं कारण ठरलं. तसेच पकंजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून केलेल्या उपोषणासंदर्भातील वक्तव्य देखील महागात पडलं.

मुंडे यांनी जुन्या फळीतील प्रमुख नेत्यांना संपर्क करायचं टाळलं. त्याचबरोबर मतदारसंघातील जातीय ध्रुवीकरणामुळे निवडणुकीत मतांवर परिणाम झाला. मुस्लिम बहुल भागामध्ये केंद्र सरकारविषयी असलेली नाराजी उमटत होती. तर मराठा बहुल गावांमध्ये पंकजा मुंडे यांनी प्रचारासाठी गेल्या नाहीत, या कारणामुळे मुंडे यांना परभवाला सामोरे जावं लागलं.

बजरंग सोनवणे यांच्या विजयाची कारणे काय?

बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करून भाजपचा बालेकिल्ला भेदला. या मतदारसंघात मुंडे यांच्या बाजूने नेत्यांची फौज उभी होती. त्यामुळे बजरंगे सोनवणे यांना सहानुभूती मिळत होती. प्रचारादरम्यान बजरंग सोनवणे यांनी मराठा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागणी संसदेत आवाज मांडण्याचे आश्वासन दिले.

बीडमध्ये शरद पवारांची यशस्वी खेळी; पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणे काय? तर सोनवणेंना कोणाची साथ मिळाली?
Minister Who Lost In Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; १९ मंत्र्याचा झाला पराभव, पाहा लिस्ट

बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची स्तुती केली. तसेच सोनवणे यांना मुस्लिम समाजातून एकतर्फी साथ मिळाली. सोनवणे हे प्रत्येक दिवशी ३० ते ४० गावात प्रचाराचा जायचे. तर वाडी-वस्तीवरही जाऊन संपर्क केला. ज्या भागात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची फळी नाही, त्या ठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी यंत्रणा राबवली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनाही सहानुभूती देखील मिळाली, याचा फायदा झाला. या कारणामुळे सोनवणे यांनी मुंडेंना धूळ चारली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com