२ मैत्रिणींचा एकाच बॉयफ्रेंडवरून वाद; महिला होमगार्डला मैत्रिणीनेच संपवलं, बीडमध्ये लव्ह ट्रायंगलचा 'असा' शेवट

Love Triangle Turns Deadly: बीडमध्ये प्रेमप्रकरणातून होमगार्ड महिला अयोध्या व्हरकडे हिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तपास करीत ४ आरोपींना अटक केली असून बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
Love Triangle Turns Deadly
Love Triangle Turns DeadlySaam TV News
Published On
Summary
  • बीडमध्ये प्रेमप्रकरणातून होमगार्ड महिला अयोध्या व्हरकडे हिची हत्या करण्यात आली.

  • मैत्रीण फडताडे हिने रागातून गुन्हा केला असून तिला साथीदारांची मदत घेतली होती.

  • अयोध्येचा गळा दाबून खून करून मृतदेह नाल्यात फेकण्यात आला.

  • पोलिसांनी तपास करीत ४ आरोपींना अटक केली असून बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे बीड हादरलं आहे. प्रेमप्रकरणातून होमगार्ड महिलेला संपवण्यात आलं आहे. बॉयफ्रेंडवरून २ मैत्रिणींमध्ये वाद सुरू होता. यातूनच होमगार्ड महिलेची हत्या करण्यात आली आहे. नंतर महिलेचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत मैत्रिणीसह ४ जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणानंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

अयोध्या राहुल व्हरकडे (वय वर्ष २६) असे मृत महिलेचं नाव आहे. ती बीडच्या गेवराई येथील रहिवासी होती. चार वर्षांपूर्वी अयोध्याच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. तिला ३ वर्षांची मुलगीही आहे. ती सध्या सासरी असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी तिची होमगार्डमध्ये भरती झाली होती. अयोध्या अंबिका चौक परिसरात पोलीस भरतीची तयारीही करीत होती.

Love Triangle Turns Deadly
अतिभारामुळे मोनोरेल पुन्हा झुकली; आचार्य अत्रे स्थानकाजवळ थांबली, ५० प्रवाशांना उतरवलं | VIDEO

अयोध्याची फडताडे नावाची मैत्रीण होती. तिचे राठोड नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांनंतर राठोडची अयोध्याशी जवळीक वाढली. यामुळे फडताडेला ही बाब सहन झाली नाही. तिच्या मनात अयोध्याविषयी प्रचंड राग होता. तिनं अयोध्येचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. तिने यासाठी काही साथीदारांची मदत घेऊन प्लॅन रचला.

Love Triangle Turns Deadly
'माझ्या वाटेला गेलात तर, तुमच्याxxx नांगराचा फाळा..' भाषण देताना महायुतीच्या आमदाराची जीभ घसरली

दोन दिवसांपूर्वी तिनं अयोध्येला घरी बोलावून घेतलं. घरी त्यावेळेस कुणीच नव्हतं. तिनं इतरांच्या मदतीने अयोध्येचा गळा दाबला. तसेच खून केला. यानंतर मृतदेहाचा विल्हेवाट लावली. मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवला. नंतर स्कूटी घेऊन अज्ञात जागेवर गेली. झाडीत असलेल्या नाल्यात तिनं अयोध्येचा मृतदेह फेकला. दरम्यान, अयोध्येचा मृतदेह तंरगत पाण्यावर आला.

Love Triangle Turns Deadly
बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला शेतात शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं; किटकनाशक पिऊन मृत्यूला कवटाळलं

स्थानिकांनी गुरूवारी सकाळी मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासात पोलिसांना लव्ह ट्रायंगलमधून अयोध्येचा मृत्यू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास करीत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com