Beed Crime News: बीडमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

Crime News Update: याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv
Published On: 

Beed Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. बीडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. (Crime News In Marathi)

Beed Crime News
Beed Farmer: बीड जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून लागलेली ओळख धनंजय मुंडे पुसणार?

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या (Beed) गेवराई शहरात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील संजय नगर भागात असणाऱ्या एका लिंबाच्या झाडाखाली हा मृतदेह आढळला आहे. सचिन साहेबराव चव्हाण वय 25 रा.सुशी तांडा ता.गेवराई असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेची माहिती कळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेची माहिती घेत पंचनामा केला. दरम्यान मयत सचिन चव्हान याचा खून झालाय की आत्महत्या केली ? याचा तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Beed Crime News
Beed Farmer: बीड जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून लागलेली ओळख धनंजय मुंडे पुसणार?

नवविवाहितेची आत्महत्या...

पाचोरा येथील गोविंदनगरात वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय विवाहितेने घराच्या मागील बाजूस असलेल्या (Pachora) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१३ जुलै) सकाळी घडली.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली असली, तरी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी सासरच्या जाचाला कंटाळून काजलने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com