Beed Rajaram Dhus
Beed Rajaram DhusSaam TV

धक्कादायक! बीडमध्ये ४० वर्षीय अकॅडमी संचालक प्राध्यापकाची आत्महत्या

राजाराम शिवाजी धस असं आत्महत्या केलेल्या संचालक प्राध्यापकाचं नाव आहे.
Published on

बीड : बीड जिल्ह्याला आत्महत्याचं ग्रहण लागलं आहे. दररोज कुठे ना कुठे आत्महत्याची घटना घडल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी चार शेतकऱ्यांनी एकाचं दिवशी आत्महत्या केल्या होत्या. तर काल एकाच दिवशी दोघांनी आत्महत्या केल्या होत्या. आज पुन्हा एकदा एका अकॅडमी चालक असणाऱ्या, 40 वर्षीय संचालक प्राध्यापकाने, गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज शहरातील नाथसृष्टी अंकुशनगर भागात घडली आहे.

Beed Rajaram Dhus
मोठी बातमी! पंकजा मुंडे समर्थकांची भाजप कार्यालयावर दगडफेक

राजाराम शिवाजी धस वय 40 रा.नाथसृष्टी, अंकुश नगर बीड असं आत्महत्या केलेल्या संचालक प्राध्यापकाचं नाव आहे. राजाराम धस हे शहरातील जिज्ञासा ॲकॅडमीचे माजी संचालक आहेत. तर ब्राईट ॲकॅडमीत ते प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. त्या ठिकाणी ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांची तयारी करून घेत होते.

Beed Rajaram Dhus
वादळी वाऱ्याने विद्युत तार तुटली; धक्‍का लागल्‍याने बालकाचा मृत्‍यू

मात्र त्यांनी आज आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान प्राध्यापक राजाराम धस यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com