Beed Breaking News: सरपंचाच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं लोणगावमध्ये खळबळ

Beed Crime News: बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणगाव येथील एका ३५ वर्षीय ग्रामसेवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
 Longaon Village Majalgaon
Longaon Village MajalgaonSaam TV

Beed Latest Marathi News

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणगाव येथील एका ३५ वर्षीय ग्रामसेवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रवींद्र सर्जेराव पवार, असं आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Longaon Village Majalgaon
Parbhani News: खळबळजनक! परभणीतील जवानाने राजस्थानमध्ये संपवलं जीवन; पालम तालुक्यावर शोककळा

याप्रकरणी मयत रवींद्र पवार यांचा भाऊ सुनील पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजलगाव शहर (Beed News) पोलिसांनी सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. नारायण राऊत, (सरपंच लोणगाव) आसाराम आलाट (ग्रा.प सदस्य) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याशिवाय ग्रामपंचायत ऑपरेटर आणि लिपीक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील पवार यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, लोणगावचे सरपंच नारायण राऊत, ग्रा.पं. सदस्य आसाराम आलाट, ऑपरेटर आगे व लिपिक सिद्दीकी यांनी रवींद्र पवार यांना धमकी देऊन बेकायदेशीर कामे करून घेतली होती. (Latest Marathi News)

त्यामुळे व्यथित होऊन पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची माजलगाव पंचायत समितीत बदली झाली होती. त्यांना बेकायदेशीर- कामासाठी वरील चौघांनी दबाव आणला. नोकरी जाण्याच्या चिंतेतून पवार यांनी आत्महत्या केली, असं फिर्यादीत म्हटले आहे.

 Longaon Village Majalgaon
Manohar Joshi: मनोहर जोशी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ हळहळले; दिग्गजांकडून आठवणींना उजाळा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com