मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली-मिरजेत दाखल... 

मिरजेत गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील गणेश मुर्त्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.
मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली-मिरजेत दाखल... 
मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली-मिरजेत दाखल... विजय पाटील

सांगली: मिरजेत गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील गणेश मुर्त्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. सुबक आणि आकर्षक मराठमोळ्या रूपातील गणेश मुर्ती, कागदी पर्यावरण पूरक मखर पहिल्यांदा मिरजेत दाखल झाले आहेत. गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर चार फुटांच्या आतील गणेश मुर्तीचे स्टॉल मिरजेत लागले आहेत. (beautiful ganpati bappa in marathi look arrived in miraj)

हे देखील पहा -

मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली-मिरजेत दाखल... 
मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली-मिरजेत दाखल... विजय पाटील

प्रति वर्षी सांगली मिरजेतील स्थानिक गणेश मूर्ती सोबत सोलापूर, कोल्हापूर येथूनही गणेश मुर्ती विक्रीसाठी आणल्या जात होत्या. आता मुंबई, पुणे येथूनही विविध आकर्षक मोहक विविध रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती विक्रीला आल्या आहेत. गणपतीच्या विविध रूपातील मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. गणेशमुर्ती स्थापनेच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सजावटच्या साहित्याचे स्टॉल मिरजेत सजले आहेत. थर्मोकोल मखरला यावेळी बगल देऊन पर्यावरण पूरक असे कागदी मखर पहिल्यांदा मिरजेत विक्रीला आले आहेत.

मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली-मिरजेत दाखल... 
शाळेची एक चुक अन् टॅापर विद्यार्थ्यांवर आली वनवन फिरायची वेळ

मुंबईच्या लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेशगल्लीचा राजा, दगडूशेठ हलवाई, यांच्या छोट्या मुर्त्या सांगलीमध्ये दाखल झाल्या आहेत. साधारणतः हा दीड फुटांपासून तीन फुटापर्यंत या मुर्त्या आहेत. या कृष्णाच्या रुपात, बाल गणपती, यावेळीचा सुप्रसिद्ध लाडू गणपती, साईबाबा रुपात, कासवावर सवार असलेली मूर्ती, महाराजांच्या रुपात असे अनेक वेगवेगळ्या रुपात मुर्त्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com