झाडाला हात पाय बांधून मारणारे १३ जण अटकेत; गावात निरव शांतता

crime
crime
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडी क्षेत्र असलेल्या आणि दुर्गम अशा जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथे करणी-भानामती केल्याच्या संशयावरुन एका कुटुंबास मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणाच्या चाैकशी अंती सध्या १३ जणांवर पाेलिसांनी गुन्हा crime नाेंद करुन त्यांना अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती गावातील एका कुटुंबावर जादूटोणा केल्याचा गावकऱ्यांचा संशय होता. त्यामुळे कसलाही विचार न करता गावकऱ्यांनी संगनमत करून या लोकांना भर चौकात दोराने झाडाला बांधून मारहाण केली. संपूर्ण गाव या सात लोकांवर तुटून पडला होता. यात हे सातही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या चंद्रपुरात chandrapur उपचार सुरू आहेत.

शांताबाई कांबळे, साहेबराव हुके, धम्मशील हुके, पंचफुला हुके, प्रयागबाई हुके, शिवराज कांबळे, एकनाथ हुके अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाल्यावर पोलिसांनी रविवारी गावात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले असे जिवतीचे पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले.

जादूटोणा, भानामती किंवा करणी हे सारे प्रकार कसे थोतांड आहे, हे अंनिसने इथे समजावून सांगितले. गावातील चार महिलांच्या अंगात देवी आली आणि त्यांनी पीडितांची नावे सांगितली. या चारही महिलांना आता चंद्रपुरात आणून त्यांच्यावर मानसोपचार केले जाणार आहेत. या घटनेकडे अंनिसने संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे असे अनिल दहागावकर (अंनिस कार्यकर्ता, चंद्रपूर) यांनी नमूद केले.

सध्या गावकऱ्यांचे योग्य प्रबोधन करून आता गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात शांतता आहे. प्रारंभी या घटनेला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला, पण तसा कोणताही प्रकार इथे घडलेला नाही असे आमदार सुभाष धोटे यांनी स्पष्ट केले. आमदार धाेटे यांनी जातीयवादाचा प्रकार फेटाळून लावत पोलिसांना योग्य दिशेने तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत.

crime
Modi Express च्या माेफत प्रवासासाठी यांना करा फाेन : नितेश राणे

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार VijayWadettiwar यांनी देखील घेतली आहे. कायद्याचा धाक निर्माण व्हावा, यासाठी कायदे आणखी कठोर करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुढच्या अधिवेशनात या विषयावर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील हा सीमावर्ती भाग तेलंगणा लगत आहे. इथे आरोग्याचे अनेक प्रश्न आवसून आहेत. निरक्षरतेमुळे या प्रश्नांची सांगड अंधश्रद्धेशी घातली जाते. त्यामुळे या भागातील लोकांचे योग्य प्रबोधन करणे आता गरजेचे झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com