Barsu Refinery Project: बारसू प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! कातळ शिल्पांना धक्का न लावता रिफायनरी होणार

Latest News on Ratnagiri's Barsu Oil Refinery Project : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी 62 कातळशिल्पांची नोंद असून त्यांना धक्का न लावता रिफायनरी प्रकल्प पूर्ण केला जाईल असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Barsu Petroglyphs
Barsu Petroglyphs saam tv

Minister Sudhir Mungantiwar On Barsu Refinery Project:

कोकणातील राजापूर बारसू येथील प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. या पकल्पाच्या सर्वेक्षणाविरोधात स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील केलं. दरम्यान विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी 62 कातळशिल्पांची नोंद असून त्यांना धक्का न लावता रिफायनरी प्रकल्प पूर्ण केला जाईल असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Barsu Petroglyphs
Breaking News: सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान मोदींची थेट शरद पवारांनाच ऑफर? केंद्रात मोठं स्थान देणार, सूत्रांची माहिती

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत लेखी प्रश्नोत्तरात सांगितले की, बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीच्या ठिकाणी 62 कातळशिल्पांची नोंद असून त्यांना धक्का न लावता रिफायनरी प्रकल्प पूर्ण केला जाईल. या कातळशिल्पांसह रत्नागिरीतील १७ ठिकाणच्या कातळशिल्पांचे जतन संवर्धन करण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Tajya Marathi Batmya)

तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी १७० कातळशिल्प असून, त्यांना रिफायनरीमुळे धोका निर्माण झाला असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याविषयी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. (Latest Political News)

Barsu Petroglyphs
Rohit Pawar Protest: मंत्री उदय सामंतांचा एक शब्द अन् रोहित पवारांकडून आंदोलन मागे; तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार?

राज ठाकरेंनी निदर्शनास आणून दिली होती बाब

येथील कातळ शिल्पांचा मुद्दा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरला होता. रत्नागिरीतील सभेदरम्यान राज ठाकरे यांनी या प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या कातळ शिल्पाचे सॅटेलाईट फोटो देखील दाखवले होते. हे शिल्प पाहायला जगभरातील लोक येतात, तसेच कातळशिल्प नामशेष होणार असल्याची भीती व्यक्त करत याच्या आसपास कोणतीही डेव्हलपमेंट करता येत नाही असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com