Amazon Easy Store च्या फ्रँचायसीला भूलला; ५ लाख गमावून बसला; दाेघांवर संशय

बार्शी पाेलीस तपास करीत आहेत.
Crime
Crime SaamTvNews
Published On

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी (barshi) तालुक्यात अमेझॉन ई-स्टोअरची फ्रँचायसी (amazon easy store franchise) देतो. त्यातून वस्तूंची विक्री ऑफलाईन (offline) तसेच ऑनलाईन (online) व्यवहारातून १८ टक्के, १२ टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवून एकाची ४ लाख ९७ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोपट उमेश गुंजाळ यांच्या तक्ररीवरुन (solapur) बार्शी तालुका पोलीसांत (barshi police) दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (amazon easy store latest marathi news)

याबाबत पाेलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी : उमेश गुंजाळ यांना २९ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान वेळोवेळी अब्दुल रेहमान आणि आलोक या दाेघांनी अमेझॉन ई-स्टोअरची फ्रँचायसी देऊ असे सांगून नाेंदणीसाठी १५ हजार रूपये, करारनामासाठी ३८ हजार रूपये, सेटलमेंट अकाऊंट उघडण्यासाठी ८५ हजार रूपये तसेच मिनी फ्रँचायसी शुल्क म्हणून १ लाख ५५ हजार रूपये, वाहतुकीसाठी ९४ हजार रूपये व जीएसटीसाठी १ लाख ८ हजार रूपये असे एकूण ४ लाख ९७ हजार १०० रुपये अशी रक्कम घेतली.

Crime
FIH Women's Junior World Cup: इंडिया हरली; जर्मनी विरुद्ध नेदरलँड अंतिम लढत

ही सर्व रक्कम ऑनलाईन पद्धतीने दिल्याचे पोपट उमेश गुंजाळ यांनी नमूद केले. दरम्यान त्यानंतर काेणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंजाळ यांनी अब्दुल रेहमान आणि आलोक यांच्या विरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बार्शी पाेलीस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Crime
सात हजाराची लाच घेताना पाटबंधारे विभागाचा मोजणीदार अडकला ACB च्या जाळ्यात
Crime
शिरवळच्या दराेड्यासह ५ घरफाेडीतील आराेपींचा शाेध सुरु : तेजस्वी सातपुते
Crime
Dapoli: देगावात परप्रांतीयासह घरमालकास मारहाण; २० जणांवर गुन्हा दाखल
Crime
Maharashtra Kesari: मैदानात गाळला घाम...पदरी नाही इनाम : पृथ्वीराज पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com