Ujani Dam : उजनी धरणातील पाणीसाठा प्लस मध्ये; धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याचा परिणाम

Baramati News : सध्या उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून दीड लाख क्युसेकच्या आसपास पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे.
Ujani Dam
Ujani DamSaam tv
Published On


बारामती
: सोलापूर, अहमदनगर यासह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मायनसमधून प्लसमध्ये आलं आहे. उजनी धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर येऊन पाणी धरणात येत आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून धरणात पाण्याची आवक सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.  

Ujani Dam
Bogus Fertilizer : डीएपी खताच्या बॅगेत माती; अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी विभागाकडून कारवाई

यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र दुष्काळ होता. धरणातील पाणी देखील आतले होते. त्यानुसार (Ujani Dam) उजनी धरण हे  २१ जानेवारीलाच मायनस मध्ये गेल होते. मागील ४४ वर्षाचा इतिहास मोडीत निघाला होता. यावर्षी उजनी धरण हे ६० टक्के मायनसमध्ये गेले होतं. त्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. यंदाच्या (Rain) पावसाळ्यात ते पुन्हा कधी प्लसमध्ये येणार याचे वेध सर्वांना लागले होते. अखेर आज शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये आलं आहे.

Ujani Dam
Nandurbar Water Shortage : भर पावसाळ्यात नंदुरबारकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा; धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा

सध्या उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून दीड लाख क्युसेकच्या आसपास पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी आहे. ज्यावेळी उजनी धरण १०० टक्के भरते. त्यावेळी ११७ टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी ६३ टीएमसी हा मृत साठा म्हणून गणला जातो तर ५४ टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो. उजनी १०० टक्के होण्यासाठी आणखीन ५४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com