Baramati Suicide Case
Baramati Suicide CaseSaam tv

Suicide Case: आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही; नववीतील मुलाने उचलले टोकाचे पाऊल

आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही; नववीतील मुलाने उचलले टोकाचे पाऊल
Published on

बारामती : आईने मोबाईल घेऊन दिला नाही; म्हणून नाराज झालेल्या नववीतील शाळकरी मुलाने गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केली. सदर दुर्दैवी घटना बारामती (Baramati) तालुक्यातील क-हावागजमध्ये घडली. या घटनेमुळे क-हावागज परिसरात शोककळा पसरली आहे. (Baramati Today News)

Baramati Suicide Case
Leopard Attack: सलग तिसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्‍ला; चाळीसगाव तालुक्यात पशुसंहार सुरूच

शुभम मोतीराम धोत्रे असे या मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण (Education) घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमच्‍या वडीलांचा मृत्‍यू (Death) झाला आहे. तर त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. शुभम गेली काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता.

निराश होवून केली आत्‍महत्‍या

मुलगा नवीन मोबाईलसाठी हट्ट करत होता. पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. त्यातून निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com