Balasaheb Thorat: नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य; बाळासाहेब थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र

परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
balasaheb thorat
balasaheb thoratSaam TV
Published On

मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यानच्या गोंधळात गप्प असलेल्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी काल मौन सोडलं. विधानपरिषद निवडणूक दरम्यान जे काही घडलं, जे राजकारण झालं ते व्यथीत करणारं होतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

याबाबत आता बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी पक्षश्रेंष्ठींना पत्र लिहिलं आहे.

balasaheb thorat
Pune Bypoll: कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला! 'साम टीव्ही'च्या बातमीवर शिक्कामोर्तब

माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीत राजकारण झालं. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली, असं थोरातांनी म्हटलं आहे.

balasaheb thorat
Sharad Pawar: शरद पवारांनाही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची भुरळ, पण व्यक्त केली एक खंत...

दरम्यान अहमदनगरमधील कार्यकर्त्यांनावर देखील कारवाई झाली आहे. यात कोठेही माझं मत विचारात घेतले नाही. याबाबत देखील बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. थोरातांच्या पत्रामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com