Maharashtra Politics: 'खासदार डोक्यावर आपटला', बाळासाहेब थोरातांकडून सुजय विखेंचा समाचार, लेकीनेही ठणकावले; VIDEO

Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe Patil: संगमनेर तालुका हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे. आम्हाला गर्दी गोळा करण्यासाठी बसेस पाठवाव्या लागत नाहीत, असे जयश्री थोरात म्हणाल्या.
Maharashtra Politics
Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe PatilSaamtv
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी

Sangamner Assembly Election 2024: माजी खासदार सुजय विखे यांनी गेल्या काही दिवसांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघात अनेक सभा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे. बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा घेत विखे पिता पुत्रांवर टिका केली आहे.

खासदार नगरला आपटला मात्र तो डोक्यावर आपटला हे आता कळालं अशा शब्दात थोरातांनी सुजय विखे यांची खिल्ली उडवली आहे. तर इथे येऊन माझी टिंगल करताय, मी बाळासाहेब थोरात यांची मुलगी असून, संयम राखू शकते, मात्र वेळ प्रसंगी चांगली ठणकावू शकते, अशा शब्दात जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांना खडे बोल सुनावले आहेत..

बाळासाहेब थोरातांनी उडवली विखेंची खिल्ली

"शिर्डी मतदारसंघ गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आणि दहशतमुक्त करण्यासाठी कार्यक्रम सुरू करायचा आहे. इथे खूप दहशत आणि धाक आहे. गणेश कारखान्याच्या वेळेस दहशतीचे झाकण बरेचसे उघडले. लोकसभेला तर खूपच आऊट झालं, थोडेफार राहिलं असेल तर ते या निवडणुकीत काढून टाकायचे. संगमनेरमध्ये येऊन कुणी काहीही भाषणं केली तरी काळजी करू नका. नगरमध्ये खासदार आपटला, पण आता कळालं तो डोक्यावर आपटला होता. आता कळालं असे भाषणं का व्हायला लागले. डोक्यावर आपटल्यावर अशीच भाषणं होणार," असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली.

बोल तू लीड वाढेल...

"संगमनेरचे आमचे लोक समर्थ आहेत. जितका बोलाल तेवढं माझं लीड वाढेल. बोल तू, लीड वाढल्याशिवाय राहणार नाही. यांच्या सभा म्हणजे गाड्या - घोड्या. नंतर काहीतरी खाटुक खुटुक असतं. लोक उचलायचे, न्यायचे, बसवायचे आणि फोटो काढायचा, आम्ही सगळा समाचार घेऊ, पुरा कार्यक्रम होईल, काळजी करू नका. शिर्डीत दहशतवाद विरोधात आंदोलन सुरु करा, दहशतवाद से आजादी " हे आपलं या निवडणुकीत घोषावाक्य असलं पाहिजे. हे ज्या पक्षात जातात, त्याचा पदर जाळायचा कार्यक्रम करतात," असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

Maharashtra Politics
Parner Politics: 'मविआ'ला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही', ठाकरेंच्या शिवसैनिकांचा इशारा, राणी लंकेंच्या उमेदवारीवरुन कलह

जयश्री थोरातांनीही ठणकावले!

"संगमनेर तालुका हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे. आम्हाला गर्दी गोळा करण्यासाठी बसेस पाठवाव्या लागत नाहीत. इथल्या जनतेचे बाळासाहेब थोरात यांच्यावर नितांत प्रेम आहे. मात्र आता काळ वेगळा आहे. आपल्याला या बालेकिल्ल्याचे रक्षण करायचे आहे. बाहेरची ताकद आक्रमण करत आहे. जेव्हा ते बाळासाहेब थोरात यांच्यावर बोलतात तेव्हा संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचते. ते मला म्हणतात "ताई ओ ताई", कुणाची टिंगल करताय? मी बाळासाहेब थोरात यांची मुलगी, संयम राखू शकते, चांगली खनकावू पण शकते. बोलायचे असेल तर शिस्तीत बोला," असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला.

Maharashtra Politics
NCP Dispute : अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; विधानसभा निवडणुकीत 'घड्याळ' वापरता येणार, पण एका अटीवर, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com