'सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं,कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका

Manoj Jarange Slams Government: बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचीचं आश्वासन दिलं असलं तरी त्यावरुन नवं राजकारण पेटलंय... बच्चू कडूंचं आंदोलन जरांगेंना शह देण्यासाठी असल्याची चर्चा रंगलीय... कर्जमाफीच्या आश्वासनातून निर्माण झालेला राजकीय संघर्ष
Bachchu Kadu and Manoj Jarange in political crossfire over Maharashtra’s farmer loan waiver promise.
Bachchu Kadu and Manoj Jarange in political crossfire over Maharashtra’s farmer loan waiver promise.Saam Tv
Published On

सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक केलीय, हे वक्तव्य केलंय मनोज जरांगेंनी.. आणि त्याला कारण ठरलंय बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर सरकारने दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन... होय... शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांनी सरकारवर आसूड उगारला होता.. तर या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि शेतककरी नेत्यांची बैठक झाली.. या बैठकीत 30 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं सांगत सरकारने शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोळवण केली.. हेच जरांगेंना खटकलं आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत जरांगेंनी आंदोलक नेते आणि सरकारवर टीकास्त्र डागलं...

दुसरीकडे तुम्ही उपोषण सोडल्यानंतरही लोकं अशीच भावना व्यक्त करत होते अशा शब्दात बच्चू कडूंनी जरांगेंना मिश्कील टोला लगावलाय. खरंतर राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालाय. त्याला आधार देण्यासाठी सरकारने 32 हजार 628 कोटी रुपये मंजूर केले आहेत... मात्र ही फक्त तात्पुरती मदत आहे.. त्यामुळे बळीराजाला वाचवण्यासाठी कर्जमाफीची मागणी करण्यात आलीय.. त्यासाठी बच्चू कडूंनी छेडलेल्या आंदोलनाला जरांगेंनीही पाठींबा दिलाय... मात्र राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाची परिस्थिती नेमकी कशी आहे?

राज्यातील 24 लाख 89 हजार 566 शेतकऱ्यांकडे 35 हजार 577 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे... तर या शेतकऱ्यांची बँक खाती NPA करण्यात आले आहेत... त्यामुळे वसुली थांबवली असली तरी शेतकऱ्यांचं बँक खातं एनपीए करण्यात आल्यानं नवीन कर्ज काढताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो...

खरंतर मनोज जरांगे 2 नोव्हेंबरला शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडणार होते.. मात्र त्याआधीच बच्चू कडूंनी कर्जमाफीचा महाएल्गार पुकारला आणि सरकारकडून कर्जमाफीचा शब्द घेतला... त्यामुळे जरांगेंना शह देऊन त्यांच्या आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी बच्चू कडूंचं आंदोलन होतं का? याचीच चर्चा रंगलीय... तर कर्जमाफीच्या आंदोलनाच्या टीकेमुळे आता जरांगे विरुद्ध बच्चू कडू संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com