यंदाच्या निवडणुकीत सहकार (यशोमती ठाकूर) विरुद्ध परिवर्तन (बच्चू कडू) पॅनल अशी लढत आहे. या निवडणुकीचा निकाल दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
अमरावती : ज्यांनी शेतक-याला लुटले हाेते. शेतक-याच्या व्याजातून दलाली खाल्ली त्याचा हा दणका आहे. त्यांनी कार्यकर्त्याला सावकारीतून साेडले नाही. त्यांचे वावर लिहून घेतले हाेते. हे सर्व शेतक-यांनी जाणले. शेतक-याचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिल्यानेच त्यांनी आम्हांला विश्वासाने निवडून दिले आहे असे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेले राज्यमंत्री आणि परिवर्तन पॅनलचे संघटक बच्चू कडू यांनी नमूद केले. bacchu-kadu-wins-amravati-district-cooperative-bank-election-result-update-yashomati-thakur-sml80
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतमाेजणीस आज सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला आहे. यंदाची निवडणुक रंगतदार झाल्याने सहकार की परिवर्तन पॅनेल काेण विजयी हाेणार amravati bank election result याची उत्सुकता बॅंकेच्या सभासदांसह जनतेस लागली आहे.
संत गाडगेबाबा सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर एकेक निकाल हाती येऊ लागले आहे. सहकार पॅनलच्या २ उमेदवारांनी विजय मिळविल्यानंतर तिसरा निकाल राज्यमंत्री बच्चू कडूंचा लागला. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध (बबलु) देशमुख यांचा पराभव केला. बच्चू कडू यांना २२ मते मिळाली आहेत. बबलु देशमुख यांना १९ मते मिळाली आहेत. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत प्रथमच उमेदवारी जाहीर केलेल्या बच्चू कडू यांनी विजय मिळवित परिवर्तन पॅनलची खाते उघडले आहे.
बच्चू कडूंच्या विजयाची घाेषणा हाेताच त्यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला. ज्यांनी शेतक-याला लुटले हाेते. शेतक-याच्या व्याजातून दलाली खाल्ली त्याचा हा दणका आहे. त्यांनी कार्यकर्त्याला सावकारीतून साेडले नाही. त्यांचे वावर लिहून घेतले हाेते. हे सर्व शेतक-यांनी जाणले. शेतक-याचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिल्यानेच त्यांनी आम्हांला विश्वासाने निवडून दिले असे विजयानंतर परिवर्तन पॅनलचे संघटक बच्चू कडू यांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.