NCP Politics : एक गेल्याने फरक पडत नाही, ५ येतील; निलेश लंकेंच्या भूमिकेवर अजित पवार गटाची प्रतिक्रिया

Babarao Atram on Nilesh Lanke : निलेश लंके यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी टीका केली आहे.
NCP
NCPSaam Tv
Published On

पराग ढोबळे | नागपूर

Nagpur News :

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. निलेश लंके यांनी शरद पवार यांची आज भेट देखील घेतली. आज ते शरद पवार गटात प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. मात्र निलेश लंके यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी टीका केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NCP
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' उद्या महाराष्ट्रात धडकणार! शिवाजी पार्कवरील विराट सभेने होणार समारोप

निलेश लंके पाच-सहा महिने इकडे होते. दरम्यान त्यांनी त्यांची सर्व कामे आटोपून घेतली. पण एक गेल्यानं काही फरक पडत नाही. एक गेले तर पाच येतील, असं धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलं.

भास्कर जाधव आमच्या गटात आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. भास्कर जाधव पूर्वी आमच्या पक्षात होते आणि प्रदेशाध्यक्ष देखील होते. भास्कर जाधव चांगले नेते आहेत, असंही धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

NCP
Sharad Pawar News: ईडी भाजपचा घटक पक्ष, कारवाया फक्त विरोधी नेत्यांवर.. शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली!

शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निलेश लंके हे देखील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याची चर्चा आहे.

निलेश लंके यांचे सुप्यामध्ये भावी खासदार असे पोस्टर झळकले आहे. दमदार आमदार फिक्स खासदार अशा आशयाचे हे बॅनर्स त्यांच्या वाढदिवसानिमित्त लागेल आहेत. दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com