Aurangabad: लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील
Aurangabad: लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सीलडॉ. माधव सावरगावे

Aurangabad: लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील

या कारवाईमुळे शहरात दुकानदार आणि इतर पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले आहे.
Published on

औरंगाबाद - जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक, गॅस एजन्सी, रेशन ग्राहक दुकानदार आणि नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना आणि आदेश 9 नोव्हेंबर रोजी जारी केले होते. ह्या आदेशाच्या अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश देखील देण्यात आले होते.

हे देखील पहा -

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा "no vaccination no petrol" या आदेशाचा भंग केल्याचे तसेच मास्कचा वापर न करणे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे, अशा अनेक गोष्टी आढळल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार रविवारी रात्री बाबा पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. आता तशाच पद्धतीने इतर ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे शहरात दुकानदार आणि इतर पेट्रोल पंपचालकांचे धाबे दणाणले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com