छत्रपती शिवरायांची जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात. असाच एक आदर्श उपक्रम बीडच्या पोखरी घाट येथील तरुणांनी राबवलाय.
आतापर्यंत आपण शिवजयंती म्हटलं की डीजे, ढोलताशे, जंगी मिरवणूक, गाणे अन महाराजांसमोर डान्स, असं सगळं डोळ्यासमोर येतं. मात्र यंदाच्या शिवजयंतीनिमित्त बीडच्या पोखरी घाट येथील मावळ्यांनी, होर्डिंग, डिजे, असा अनावश्यक खर्च टाळून अत्यंत साधेपणाने मिरवणूक काढली. यातून उरलेल्या दिड लाख रुपयांतून गावातील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वराज्य अभ्यासिका’ सुरु केली. तरुणांच्या या आदर्श उपक्रमामुळे आता गावातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय झालीय. या अभ्यासिकेमुळे या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील ‘स्वराज्य’ उभा करण्यासाठीचा रस्ताच जणू सुकर झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोखरी घाट हे ऊसतोड मजुरांचे गाव आहे. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधांअभावी अभ्यासात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेत शिवजयंती समितीच्या वतीने मिरवणूकीतील अतिरिक्त खर्च टाळून, त्यातून उरलेल्या दिड लाख रुपयांतून ही अभ्यासिका उभारण्यात आली. (Latest Marathi News)
पोखरी घाट येथील जिल्हापरिषद शाळेसाठीही गावकर्यांनी वर्गणी करुन प्रशस्त अशी इमारत उभा केलेली आहे. आता गावातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाची गोडी निर्माण होणार आहे.
दरम्यान, पोखरी घाट येथील तरुण व ग्रामस्थांनी शिवजयंतीच्या माध्यमातून आदर्श उपक्रम राबवला आहे. आता अशाच पद्धतीने इतर ठिकाणीही विद्यार्थी, तरुणांसाठी आवश्यक असणार्या सुविधांची निर्मिती करण्याचे उपक्रम हाती घ्यावेत, अशीच अपेक्षा व्यक्त केली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.