Aurangzeb Tomb: औरंगजेबची कबर हटवा! अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू! बजरंग दलचा इशारा, अनेक ठिकाणी आंदोलने

Aurangzeb Tomb Protest: औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद उफाळण्याची शक्यता आहे कारण विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
Aurangzeb Tomb
Aurangzeb Tomb Protest
Published On

औरंगजेबाची कबर काढून टाका, या मागणीसाठी राज्यभरात विश्व हिंदू परिषदेसह, बंजरग दल आक्रमण झालाय. अहिल्यानगर, धाराशिव,पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर,नांदेड, कोल्हापूर आदी ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलने केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे औरंगजेबच्या प्रतिकात्मक थडग्याला पायी तुडवलं. तर काही ठिकाणी औरंगजेबच्या फोटोवर हातोडा चालवला. धाराशिवच्या उमरगा येथील पदाधिकाऱ्यांनी देखील उमरगा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे.

कबरीच्या फोटोवर हातोडा चालवत बजरंग दलाकडून निदर्शने

खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राहाता येथील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने केली. खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राहाता येथील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने केली. सरकारने लवकरात लवकर कबर हटवावी अन्यथा हिंदुत्वादी संघटना कबर उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.

भंडाऱ्यात घोषणाबाजी करत निदर्शने

औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीला घेऊन आक्रमक भूमिका घेत विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने त्रिमूर्ती चौक भंडारा येथे निदर्शने करण्यात आली. दरम्यान औरंगजेबाची कबर न हटवल्यास चलो संभाजी नगरचा नारा देत अयोध्येत कारसेवा करत पाडलेल्या मज्जिदीप्रमाणे खुलताबाद येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वात समस्त हिंदू बांधव धडकून कारसेवा करू, असा इशारा देण्यात आला.

औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू!

अंबरनाथमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दलानं आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला. सरकारने काही दिवसात स्वतःहून कबर हटवा, अन्यथा बजरंग दलाचे कार्यकर्ते चलो संभाजीनगरचा नारा देतील आणि औरंगजेबाची कबर उध्वस्त करतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

औरंगजेबची कबर हटवा

धुळ्यात सुद्धा विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करत औरंगजेबाची कबर हटवण्याची मगाणी केलीय. या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी व औरंगजेबाची कबर लवकरात लवकर नष्ट करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com