चौकशीवर चौकशी किती करणार? मंत्री संदिपान भुमरेंना निवेदन

या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसल्यामुळे फक्त चार जणांनी आंदोलन करून हे निवेदन मंत्री भुमरे यांच्या कार्यालयामार्फत त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
aurangabad
aurangabad
Published On

- अविनाश कानडजे

औरंगाबाद (aurangabad) : बीड (beed) जिल्ह्यात झालेल्या मनरेगाअंतर्गत (manrega) विविध कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न हाेऊन देखील कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली रोहयोमंत्री संदिपान भुमरे (sandhipan bhumre) यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदाेलकांनी समितीच्या माध्यमातून मंत्री भूमरे यांना त्यांच्या कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत विविध कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक ठेकेदार यांनी संगनमताने बोगस कामे दाखवून शासनाची दिशाभूल केली असून, कामे कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करत आहेत. जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनाकडे तक्रार, निवेदने आणि आंदोलनानंतर सुद्धा जाणीपूर्वक अधिकारी चौकशी आणि कारवाई करत नाहीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

aurangabad
'सेना भाजपची युती टिकविण्यासाठी 'ते' अखेरपर्यंत सक्रिय हाेते'

पुराव्यासह तक्रार केल्यानंतर तसेच अपराधी सिद्ध होऊन सुद्धा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तांत्रिक बाबींचे कारणे दाखवून चौकशीच्या नावाखाली चौकशीवर चौकशी सुरू आहेत. या अधिकार्‍यांवर एकसदस्यीय समितीकडून आरोप सिद्ध झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रिसदस्यीय समिती समोर चौकशी करण्यात येत असून अशाप्रकारे दिरंगाई करत सामाजिक कार्यकर्ते तक्रारदार यांना मानसिक त्रास देण्यात येतोय असे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com